समर्थ बँकेचा नवीन उपक्रम भाविकांच्या सेवेत एटीम सुविधा

 टीम महाराष्ट्र देशा : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने माऊलींच्या चरणी समर्थ बँकेने सेवा देण्याचे ठरवले आहे. याकरिता श्रीक्षेत्र आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये समर्थ बँकेच्या मोबाईल ATM व्हॅनचा समावेश केला आहे. याचा शुभारंभ मंगळवार दि. ३ जुलै २०१८ रोजी दुपारी ४ वाजता आळंदी येथे बँकेचे चेअरमन श्री दिलीप अत्रे व श्री जयसिंगराव रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष श्री राजन जांबोटकर, बँकेचे संचालक प्रशांत बडवे, राजेश पटवर्धन, श्रीकृष्ण कालेकर यांच्यासह श्री ज्ञानेश्वर वीर व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर मंदिर संस्थान कमिटी,आळंदी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि संकल्पना बँकेचे मुख्य कार्यकार अधिकारी श्री उमेश थोब्बी केले.

Loading...

समर्थ बँकेने पुढाकार घेत अशा अद्यावत सेवा श्रीक्षेत्र आळंदी ते पंढरपूर या अखंड वारीमध्ये देण्याचे ठरविले.यामध्ये सुसज्ज मोबाईल ATM व्हॅन असून वारकर्यांना  रोख रक्कम जवळ बाळगण्याची गरज नाही. त्याचबरोबर वारी मध्ये बचत खाते उघडता येईल व त्यासोबत ATM card (POS) मोफत दिले जाईल. याप्रसंगी Foreign Exchange सह बँकेच्या विविध सेवा कार्यरत असणार आहेत याचा लाभ भक्तांनी घ्यावा, असे आवाहन बँकेचे चेअरमन श्री दिलीप अत्रे यांनी केले.

सोलापूर, पुणे, कोल्हापूर, दादर, कल्याण व सांगली येथे बँकेच्या २८ शाखा कार्यरत असून त्या उत्तम व्यवसाय करीत आहेत. त्याचबरोबर बँकेने ई-लॉबीच्या माध्यमातून २४ तास पैसे भरणे व काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. बँकेत सेफ डिपाॅझिट लाॅकर्स CBS प्रणाली,अद्यावत डेटा सेंटर, SMS बँकिंग, नेत बँकिंग,ATM POS Card अंतर्गत खरेदी व E- Commerce मध्ये Online Bill Payment, reservation,wallet payment या सुविधा उपलब्ध आहेत. याबरोबरच मोबाईल बँकिंग अंतर्गत IMPS ची त्वरीत फंड ट्रान्स्फर, मिनी स्टेटमेंट, चेकबुक रिक्वेस्ट, स्टाॅॅप पेमेंट सेवा कार्यरत आहे. स्टेटमेंट आॅॅन ई-मेल ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवली जाते. लवकरच ICD हि सेवा ग्राहकांसाठी सुरु करणार आहेत. तरी ग्राहकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

सध्या बँकेच्या ठेवी रू.१००० कोटींच्यावर असून, कर्ज रू ६५० कोटींची आहेत. मिश्र व्यवसाय रू कोटींच्या घरात आहे. बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य असून रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या निकषांनुसार व परवानगीनुसार लवकरच ठाणे, वाशी, पुणे, येथे शाखा विस्तार होणार आहे. यानंतर त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

 Loading…


Loading…

Loading...