Share

Shinde-Fadanvis Govt | सीबीआयला राज्यात एन्ट्री करायला सरकारच्या परवानगीची गरज नाही – शिंदे-फडणवीस सरकारचा नवा निर्णय

Shinde-Fadanvis Govt | मुंबई : राज्यात अनेक बड्या नेत्यांवर कारवाई होऊन त्यांच्या चौकश्या केल्या जाण्याचं चित्र आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळतं. अशातच शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis Govt) सरकारने नवीन निर्णय जाहीर केला आहे. सीबीआय (CBI) ला राज्यात चौकशीसाठी प्रवेश करताना सरकारची परवानगी घ्यायची गरज नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे आता कोणते नेते अडचणीत येणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

महाराष्ट्र राज्यातील एखाद्या प्रकरणाचा तपास करायचा असल्यास सीबीआयला आधी राज्य सरकारला माहिती देऊन राज्य सरकारच्या परवानगीनंतरच तपासाला परवानी मिळत असे. मात्र यापुढे महाराष्ट्रातील कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयला राज्य सरकारच्या परवानगीची गरज भासणार नाही. सीबीआय कोणत्याही प्रकरणाचा तपास थेट सुरू करू शकते. सध्याच्या शिंदे फडणवीस सरकारने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा अजून एक जुना निर्णय रद्द केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णायानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मविआ नेत्यांच्या डोक्यावर सीबीआयची टांगत्या तलवारीमुळे नवीन प्रकरणे सहज उघडण्याचा धोका वाढला आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक प्रकरणे मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्याची मागणी सातत्याने होत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्याच्या अखत्यारीत येणाऱ्या कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयने राज्य सरकारची परवानगी घ्यावी, असा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Shinde-Fadanvis Govt | मुंबई : राज्यात अनेक बड्या नेत्यांवर कारवाई होऊन त्यांच्या चौकश्या केल्या जाण्याचं चित्र आपल्याला अनेक वेळा पाहायला …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now