मंत्रालयासमोर नगर पालिकेतील कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Mantralaya

 

मुंबई:  मंत्रालयासमोरील आत्महत्येचे सत्र अजूनही थांबले नाही. मंत्रालयासमोर पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. धुळ्यातील रहिवासी असलेले बबन यशवंत झोटे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. आज सोमवार दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मंत्रालय की आत्म्हत्यालय ? हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. बबन यशवंत झोटे हे धुळे नगर पालिकेतील कर्मचारी होते, अशी माहिती समोर आली आहे. धुळे नगरपालिका असताना 1989 मध्ये झालेल्या नोकर भरती प्रक्रियेची सीआयडी चौकशी करावी, या मागणीसाठी झोटे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. झोटे यांनी मनपा सेवेतून कमी करण्यात आले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करत बबन झोटे यांना ताब्यात घेतल्यानं मोठा अनर्थ टळला आहे.