मुंबई : आपल्या निरागसतेनं सर्वांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री मिथिला पालकर सध्या तिच्या आयुष्यातील अत्यंत आव्हानात्मक दिवासांना सामोरी जात आहे. मिथिलाच्या आयुष्यातून तिच्यासाठी सर्वस्वी महत्त्वाच्या स्थानी असणाऱ्या व्यक्तीच्या निधनामुळं ती पुरती कोलमडून गेली आहे.
मिथिलाच्या आयुष्यातून एक्झिट घेणारी ही व्यक्ती म्हणजे तिचे आजोबा. ज्यांना ती प्रेमानं भाऊ असं म्हणत होती, अशा मिथिलाच्या आजोबांनी वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 26 मार्च रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मिथिलानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट लिहित आपल्या आयुष्यातील या पहिल्या प्रेमाला अलविदा म्हटलं आहे.
‘माझ्या विश्वाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या आणि मला प्रोत्साहन देणाऱ्यांमध्ये अग्रस्थानी असणारे माझे भाऊ काही दिवसांपूर्वीच आपल्याला सोडून गेले. त्यांच्याशिवाय असणारं आयुष्य मला ठाऊक नाही, कळणारही नाही. मला इतकंच ठाऊक आहे, की ते एक लढवय्ये होते. त्यांची आयुष्य जगण्याची उमेदच आता आपण साजरा करणार आहोत. ते माझ्यासाठी खास होते आणि कायम अग्रस्थानीच राहतील. खूप छान राहा भाऊ. आता स्वर्गातही आनंदी वातावरण असेल. तुमच्या त्या हसण्यामुळं… ‘
मिथिलानं ही पोस्ट लिहिताच अनेक कलाकार मित्र आणि फॉलोअर्सनी तिला आधार दिला. दरम्यान, मिथिला बरीच वर्षे तिच्या आजी- आजोबांसोबत मुंबईतील दादर येथे वास्तव्यास होती.
महत्वाच्या बातम्या :
IPL 2022 : “सकाळी उठल्यापासून ते…”, कैफनं अजिंक्य रहाणेच्या स्वभावाचा केला खुलासा!
IPL 2022: मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिल्यानंतर सामन्यात ‘या’ ठिकाणी दिसला इशांत शर्मा; चाहत्यांनी लावला डोक्याला हात!
विराट कोहलीचे बालपणीचे कोच संकटात; दिल्ली क्रिकेट असोसिएशन ‘असं’ पाऊल उचलण्याच्या तयारीत!
आलियासोबतच्या लग्नाबाबत रणबीरने केला मोठा खुलासा, म्हणाला..
“मला काहीच सांगायचं नाही, नो कमेंट” – अजित पवार
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<