एका मिस्ड कॉलने कळणार पीएफची रक्कम

A missed call will tell the amount of PF

आपला पीएफ नियमित जमा होतोय की नाही? जर होत असेल तर पीएफमध्ये नेमकी किती रक्कम जमा आहे. आता या प्रश्नांची आपल्याला सहज माहिती मिळणार आहे. कारण आता तुम्ही फक्त मिस्ड कॉल किंवा SMS करून प्रॉव्हिडंट फंडातील शिल्लक जाणून घेऊ शकता.

यासाठी तुम्हाला 011-2290 1406 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यानंतर काही वेळातच तुम्हाला SMS येईल, ज्यामध्ये शिल्लक रकमेची माहिती असेल. मात्र मिस्ड कॉल देण्यासाठी ‘ईपीएफओ’च्या कागदपत्रांमध्ये नोंदवलेलाच मोबाईल क्रमांक वापरण्याची आवश्यकता आहे. तसेच तो मोबाईल नंबर PPF अकाऊंटला लिंक केलेला असलेला पाहिजे.

Loading...

तुमचा मोबाईल नंबर PPF अकाऊंटला लिंक करायचाय?

1) प्रथम https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface या वेबसाईटवर जा.

2) त्यानंतर Activate UAN वर क्लिक करा. तिथे UAN नंबर टाका. (हा नंबर तुमच्या पे स्लिपवर असेल.)

3) यानंतर आधार, पॅन, नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, ईमेल आयडी वगैरे सर्व माहिती भरा त्यानंतर Get Authorization Pin वर क्लिक करा.

4) यानंतर तुम्हाला मोबाईलवर OTP येईल. तो भरा, त्यानंतर तुम्हाला पासवर्डचा SMS येईल. मग तुम्ही साईन इन करुन तुमचा पीएफ, ई पासबूक बघू शकता.

UAN नंबर म्हणजे काय? 

1) UAN नंबर म्हणजे युनिव्हर्सल अकाऊंट नंबर.

2) प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्याला UAN नंबर पुरवते.

3) मात्र तो नंबर अॅक्टिव- कार्यरत करणे आवश्यक आहे. हा नंबर कर्मचाऱ्याच्या पे स्लिपवर उपलब्ध असतो.

4) एकदा का तुम्ही UAN अपडेट आणि तुमच्या पीएफ अकाऊंटला लिंक केलं की, तुमचा PPF पाहाणं, ई पासबूक सहज शक्य आहे.

5) मात्र यासाठी तुमचा UAN पीएफसोबत आधार कार्डलाही लिंक करणे आवश्यक आहे.

ई पासबुक म्हणजे काय?

1) तुम्हाला तुमच्या पीएफ अकाऊंटवर कोणत्या महिन्यात किती रक्कम जमा झाली याबाबतची माहिती ई पासबुकवर पाहायला मिळू शकते.

2) मात्र त्यासाठी EPFO च्या वेबसाईटवर जाऊन ई पासबुक कार्यरत करावे लागते.

3) वेबसाईटवर ई पासबुकचा पर्याय दिसेल. तिथे UAN नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर ई पासबुक दिसेल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार