Share

हवेलीत छत्रपती संभाजी राजेंचे स्मारक उभारणार; अजित पवारांची घोषणा

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar,) आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच इतर प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे. यावेळी अजित पवारांनी हवेलीत छत्रपती संभाजी राजेंचे स्मारक (memorial of Chhatrapati Sambhaji Raje) उभारणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी २५० कोटी खर्च केले जाणार आहेत.

सोबतच गोसेखुर्द प्रकल्पासाठी ८५० कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. यावर्षी १ लाख हेक्टर क्षेत्रफळावर फळबाग लागवडीची उद्दिष्टे ठेवण्यात आली आहे. फलोत्पदनासाठी ४४० कोटी नियोजित करण्यात आले आहेत. तसेच पिक कर्ज वाटपातही वाढ करण्यात अली आहे. पुढच्या दोन वर्षांत १०४ सिंचन पर्कल्प पूर्ण करण्याचे मविआ सरकारने लक्ष ठेवले आहे.

दरम्यान अजून कोणत्या मोठ्या घोषणा केल्या जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरोग्य, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक घटकांत कोणत्या योजना आखण्यात आल्या आहेत, याबाबत लवकरच कळेल. विकासाची पंचसूत्री मविआ सरकार राबवणार असल्याचे यावेळी अजित पवारांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar,) आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव …

पुढे वाचा

Finance Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now