आगामी विधानसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’ नको, राज ठाकरे घेणार मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागलं आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी दिल्लीला रवाना झाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ‘ईव्हीएम’च्या संदर्भात झालेल्या वादावरून सोमवारी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहत. दरम्यान, राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’ मशीनचा वापर न करता पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी राज ठाकरे करणार असल्याची माहिती मिळत आहे.

Loading...

लोकसभा निकालनंतर व निकालअगोदरही काँग्रेसह अनेक विरोधी पक्षांनी ईव्हीएमच्या विश्वासर्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मनसेने देखील याबाबत शंका उपस्थित केली होती. यावर आयुक्तांसमोर आपली भूमिका मांडणार असल्याचेही बोलले जात आहे.

सत्ताधारी भाजप ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील 21 विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधील 50 टक्के मतांच्या मोजणीची मागणी केली होती.Loading…


Loading…

Loading...