जळगाव: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका व्यक्तीला संतप्त शिवसैनिकांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरामध्ये घडला आहे. धरणगाव येथील हेमंत द्वितीये नावाच्या व्यक्तीने जळगाव शहराच्या एका ग्रुपवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली. या पोस्टमुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली.
दरम्यान द्वितीये हा थिएटर मध्ये सिनेमा पाहण्यासाठी येणार असल्याची माहिती शिवसैनिकांना मिळाली होती. त्यामुळे शिवसैनिकांनी त्याला थिएटर बाहेर गाठून मारहाण केली. त्यानंतर त्याने माफी मागितल्यामुळे त्याला सोडून देण्यात आले.
महत्वाच्या बातम्या:
अजून एक जेतेपद..! पी. व्ही. सिंधूनं जिंकली स्विस ओपन स्पर्धा
“काही दिवटे मातोश्रीना पैसे आणि भेटीची घड्याळं…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भातखळकरांचे टीकास्त्र
बापरे..! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माला १२ लाखांचा दंड; वाचा नक्की झालं काय!
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात मोठा राडा; विल स्मिथने सूत्रसंचालकाच्या कानशिलात लगावली
IPL 2022 : राशिद खानला मिळाली मोठी जबाबदारी..! पहिल्या सामन्यापूर्वी बनला गुजरात संघाचा…
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<