बायकोपेक्षा मेव्हणीच भारी, गड्याने थेट मेव्हणीशीच केलं लग्न

marrage

टीम महाराष्ट्र देशा : ‘साली (मेहुणी) आधी घरवाली’ अशी हिंदीत एक म्हण आहे. तर पुरुषही त्यांच्या बायकोपेक्षा त्यांच्या मेव्हाणीचीच जास्त थट्टा मस्करी करत असतात. तसेच भारतात कायदेशीर पद्धतीने एकाच विवाहाला मान्यता आहे. मात्र मध्य प्रदेशात एकाच माणसाने तीनदा विवाह केल्याची घटना घडली आहे.

मध्य प्रदेशातील भिंड शहरात एक विचित्र प्रकार घडला. या लग्नात वर एक आणि वधू दोन असा अजब प्रकार पाहायला मिळाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाच मंडपात एका मुलासोबत दोन बहिणींचे लग्न झाले. नवऱ्यानं आधी आपल्या पत्नीच्या बहिणीशी लग्न केले आणि त्यानंतर त्याच मंडपात पत्नीशी पुन्हा विवाह केला.

या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे. नवऱ्याचे नाव दिलीप असे असून, 9 वर्षांपूर्वीच त्याचे विनीता नावाच्या महिलेशी विवाह केला होता. विनीता भिंड जिल्ह्यातील मेहगाव जिल्ह्यातील गुडावली गावची सरपंच आहे. दिलीप आणि विनीता यांना तीन अपत्ये आहेत.

विनीताने स्वत: चं आपल्या नवऱ्याला दुसऱ्या विवाहाला परवानगी दिली. त्यामुळे दिलीपनं विनीता यांची बहिण रचना हिच्याशी दुसरा विवाह केला. रचना ही विनिताची चुलत बहीण आहे. विवाह मंडपात दिलीपने एकाच वेळी विनिता आणि रचना यांच्याही लग्न केले.

“माझी पहिली पत्नी विनिता हिची प्रकृती ठीक नसते. आमची मुलेही लहान आहेत, त्यांची काळजी घेण्यासाठी मला पुन्हा लग्न करावे लागले”, असे सांगितले. पहिल्या लग्नानंतर काही वर्षांनी दिलीपचे त्यांच्या मेहुणीवर प्रेम जडले. दिलीप यांनी स्वत: आपल्या पत्नीला याबाबत सांगितले, आणि तिच्या संमतीनं मेहुणीशी विवाह केला.

महत्त्वाच्या बातम्या :