मुंबईत सिनेविस्टा स्टुडिओला भीषण आग

मुंबई : कांजूरमार्ग येथील गांधीनगर भागातील सिनेविस्टा स्टुडिओला भीषण आग लागली असून अग्निशामन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. युद्धपातळीवर ही आग विझवण्याचे काम सुरु आहे. या आगीमध्ये किती नुकसान झाले याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.

सिनेविस्टा स्टुडिओत टिव्ही मालिकांचे शुटींग केले जाते. सध्या या ठिकाणी बेपनाह या हिंदी मालिकेचे शुटींग सुरु होते. त्याचदरम्यान येथे आग भडकली. मात्र ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शुटींगदरम्यान स्टुडिओत १५० कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सुमारे पाच एकर जमीनीत हा स्टुडिओ उभारण्यात आला आहे. या स्टुडिओमध्ये शुटींगसाठीची विविध लोकेशन्स तयार करण्यात आलेली असून त्यासाठी लागणारे कॅमेरे, लाईट्स आणि सेट्स अशी विविध साधनसामुग्री असल्याचे कळते. दरम्यान, अग्निशामक दल आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

You might also like
Comments
Loading...