अयोध्येतील ‘त्या’ जमिनीवर सुन्नी उक्फ बोर्ड उभारणार ग्रंथालय आणि रिसर्च सेंटर

yogi adityanath and waqf board

अयोध्या: गेले अनेक शतके सुरु असलेला वाद गेल्या वर्षाखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मिटला होता. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्री राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. तर, राम जन्मभूमीचा निकाल लागल्यानंतर मुस्लिम पक्षकार असलेल्या सुन्नी वक्फ बोर्डाला देखील ५ एकर जमीन न्यायालयाच्या आदेशानुसार अयोध्येत देण्यात आली आहे.

तर या मिळालेल्या जमिनीवर लोकोपयोगी वास्तूची निर्मिती करण्याचा समाजहिताचा निर्णय या वक्फ बोर्डाने घेतला आहे. तर, महत्वाची बाब म्हणजे जनहितार्थ उभा केल्या जाणाऱ्या या वास्तूच्या पायाभरणीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. ‘इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन’ ट्रस्टचे सचिव आणि प्रवक्ता अतहर हुसैन यांनी शनिवार याबाबत माहिती दिली.

मध्यरात्री गावातील वीज पुरवठा बंद करुन बेळगावात शिवरायांचा पुतळा पुतळा हटवला

ते म्हणाले, ‘ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अयोध्यातील धन्नीपूर गावात वक्फ बोर्डाला मिळालेल्या 5 एकर जमिनीवर रुग्णालय, लायब्ररी, सामुदायिक स्वयंपाकघर आणि रिसर्च सेंटर उभारण्यात येणार आहे. या सर्व बाबी जनतेच्या सुविधेसाठी असतील. राज्याचा मुख्यमंत्री हा जनतेसाठी काम करीत असतो. यानुसार या वास्तूच्या शिलान्यासासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आमंत्रित देण्यात येणार आहे. त्यांनी याबाबत विश्वास व्यक्त केला आहे की मुख्यमंत्री या कार्यक्रमात केवळ सहभागीच होणार नाही तर यासाठी सहयोगही करतील.’

कोल्हापूरकरांना दिलासा: राधानगरीचे २ स्वयंचलित दरवाजे बंद, तर पंचगंगेची पाणीपातळी झाली इतकी!

या निर्णयाचे आता देशभरात कौतुक होत असून प्रत्येक समाजाने देखील हा विषय सामंजस्याने बघितला पाहिजे. पंतप्रधान मोदींनी देखील राम मंदिर हे राष्ट्रीय एकतेचे प्रतिक बनेल असे उद्गार काढले होते. यावेळी मुस्लिम पक्षकारांकडून लढणाऱ्या वकिलांना, तसेच बेवारस मृतदेहांचे अंत्यविधी करणाऱ्या व्यक्तीस बोलवून अयोध्येत हि ऐक्याची भावना संपूर्ण जगाने पहिली होती.

राष्ट्रवादीच्या ‘या’ झुंजार नेत्याचे झाले कोरोनामुळे निधन; दिग्गज नेत्यांनी व्यक्त केला शोक

तर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना खुलासा केला होता.अयोध्येतील मंदिराच्या शिलान्यासानंतर सुन्नी वक्फ बोर्डाला दिलेल्या जमिनीवर मशिदीच्या शिलान्यासाठी जाणार का याबाबत पत्रकाराने प्रश्न उपस्थित केला होता. यावर मला बोलवणार नाही म्हणून मी जाणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती.