अंगणवाड्यांच्या जागाभाड्यात वाढ करण्यास मान्यता; नवीन भाडे 1हजार ते 6 हजार रुपयांपर्यत – यशोमती ठाकूर

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील खासगी इमारतीत भरणाऱ्या अंगणवाड्यांच्या जागाभाड्यात भरीव वाढ करण्यास मान्यता देण्यात आली असून ग्रामीण व आदिवासी क्षेत्रासाठी 1 हजार रुपये, नागरी क्षेत्रासाठी 4 हजार तर महानगर क्षेत्रामध्ये 6 हजार रुपये इतके नवीन भाडे असणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली. या संदर्भात लवकरच शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ॲड. ठाकूर या महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा व कामकाजाचा आढावा घेत आहेत. या आढाव्यादरम्यान राज्यातील एकूण अंगणवाड्यांपैकी 37 हजार 545 अंगणवाड्या या खासगी इमारतीत भरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भाड्यापोटी अत्यल्प रक्कम दिली जात असल्याने आवश्यक सोई- सुविधांयुक्त इमारत अंगणवाडी केंद्रांसाठी उपलब्ध होत नव्हती. ही माहिती मिळताच खासगी इमारतीत भरणाऱ्या अंगणवाड्यांसाठी भाड्याच्या रक्कमेत वाढ करण्याचे निर्देश ॲड. श्रीमती ठाकूर यांनी दिले.

Loading...

यापूर्वी सर्वच क्षेत्रातील खासगी जागेत भरणाऱ्या अंगणवाड्यांना सरसकट 750 रुपये जागाभाडे दिले जात होते. आता यापुढे ग्रामीण भागातील अंगणवाड्यांच्या जागाभाड्यात 250 रुपयांची वाढ करुन ते 1 हजार रुपये, नागरी क्षेत्रात 3 हजार 250 रुपयांची वाढ करुन 4 हजार रुपये तर महानगर क्षेत्रात 5 हजार 250 रुपये अशी भरीव वाढ करुन 6 हजार रुपये करण्यात मान्यता देण्यात आली आहे. यामुळे अंगणवाड्यांना सर्वसुविधायुक्त इमारती मिळणे शक्य होणार असून पर्यायाने बालकांचे हसत- खेळत शिक्षण यासह सर्वांगीण विकासासाठी उत्तम वातावरण मिळेल, असा विश्वासही महिला व बालविकास मंत्र्यांनी व्यक्त केला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण