जवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र एक ढोंग : अखिल भारतीय विध्यार्थी परिषद

टीम महाराष्ट्र देशा : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ५ जानेवारी २०२० रोजी डाव्या संघटनांकडून झालेली हिंसा ही अतिशय निंदनीय घटना आहे. ह्या हिंसेसदर्भात दिल्ली पोलिसांनी घेतलेली पत्रकार परिषद व जाहीर केलेल्या संघटनांची नावे ही सर्व डाव्या संघटनांची नावे आहेत. व अभाविप वर खोटे आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांनी दाखवलेल्या व्हिडिओ मध्ये डाव्या संघटनांचे नेते व कार्यकर्ते अभाविप च्या कार्यकर्त्यांना मारताना स्पष्ट दिसत आहेत. मीडिया मध्ये दाखवलेल्या सर्व व्हिडिओ चा तपशील खलील प्रमाणे आहे.

१. अमूथा जैदीप (पूर्व JNU छत्रसंघ सचिव) पेरियार हॉस्टेल समोर रॉड घेऊन उभा आहे.
२.आइषि घोष (JNU छात्र संघ अध्यक्ष) हिच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी पेरियार हॉस्टेल मध्ये शिरत आहेत.
३.शुभकीर्ती, वैलेनटीना व शांभवी झा ह्यांना पेरियार हॉस्टेल च्या समोर मारण्यात आले हे व्हिडिओ मध्ये दिसत आहे.
४.अभाविप कार्यकर्ता शिवम चौरसिया याला गर्दी करून मारण्यात आले आहे.
५.पेरियार हॉस्टेल वर दगडफेक करणारे aisa चे चुनचुन कुमार
६.गीता कुमारी (पूर्व JNU छात्र संघ अध्यक्ष) सर्व्हर रूम च्या बाहेर बसून विद्यार्थ्यांना नोंदणी पासून अडवत आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात २८ ऑक्टोबर पासून तणाव वाढला होता. डाव्या संघटनांनी विद्यार्थ्यांच्या भावना भडकवल्या नंतर जेव्हा विद्यार्थी डाव्या संघटनांन पासून दूर जायला लागले तेव्हा आपले समर्थन वाढवण्या साठी डाव्या संघटनांनी सर्व्हर रूम बंद केली व विद्यार्थ्यांना धमकवण्यास सुरवात केली अभाविप ने ह्या घटनेचा जेव्हा विरोध केला तेव्हा डाव्या संघटनांकडून हिंसा करण्यास सुरुवात झाली.
अभाविप ने सर्व व्हिडिओ दिल्ली पोलीस प्रशासनाला साक्ष म्हणून सादर केले आहेत. व झालेल्या घटनेचा सखोल व निष्पक्ष तपास व्हावा अशी मागणी अभाविप ने केली आहे.

अभाविप कडून अनेक चांगले उपक्रम जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये घेतले जातात तसेच JNU मध्ये NCC चालू करण्यात यावे या अभाविप च्या मागणीला यश आले आहे व JNU मध्ये २६ जानेवारी रोजी पहिली परेड पार पडली. आशा गोष्टी ही JNU ची खरी ओळख आहेत. परंतु ह्या गोष्टी समाजापुढे मांडल्या जात नाहीत ही अतिशय दुःखद बाब आहे.असे अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेतर्फे कळवण्यात आले आहे.