सोलापूरमध्ये बँक ऑफ इंडियासमोर दीड किलोमीटरची रांग, सोशल डिस्टन्सचा उडाला धज्जा

सोलापूर : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वारंवार सोशल डिस्टन्स ठेवण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जातं आहे मात्र सोलापूरमधील सदर बाजार येथील बँक ऑफ इंडियाच्या सामोरं जवळपास दीड किलोमीटरची रांग लागली आहे. प्रधानमंत्र्यांकडून गरजूंना 500 रुपयांचा निधी देऊ केला आहे. जनधन खात्यात जमा झालेले 500 रुपये काढण्यासाठी बँकेबाहेर लोकांनी तुफान गर्दी केली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या धज्जा उडालेल्या पाहायला मिळाले.

कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत घरात कांमधंद्यावर अवलंबून असलेल्या व विशेषतः जनधन खात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत म्हणून प्रत्येक खात्यात 500 रुपये प्रति महिना घोषणा केली. त्यानंतर मार्च महिन्याचे पैसे जमा केले. हे पैसे काढण्यासाठी बँकांच्या बाहेर तोबा गर्दी करत आहेत. त्यासाठी शुक्रवारी देखील बँकेच्या बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. या गर्दीने सोशल डिस्टन्सची ऐशी की तैशी झाल्याचे दिसून येत आहे. तर अशीच गार्गी राज्यभरात अनेक ठिकाणी आढळून आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सरकारचे निर्णय धाब्यावर बसविल्याचे दिसत आहेत.

दरम्यान, राज्यात कोरोना संसर्गाचे संकट अधिकाधिक गडद होत आहे, कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी राज्यभरात संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. नागरिकांना सोशल डीस्टन्सिंगच आवाहन केलं जातय. तरीही लोक जीव धोक्यात घालून बेजाबादारपणे रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. अशातच बँकांसमोर तर अशा प्रकारची गर्दी जास्तच पाहायला मिळत आहे. नागरिकांना याचे अजिबात गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. मात्र या सर्वांचा ताण पोलीस यंत्रणेवर पडत आहे.