दहा ते बारा जणांच्या टोळक्याने घर खाली करण्यासाठी केली भाडेकरूला मारहाण

औरंंगाबाद : घर खाली करण्याच्या कारणावरून दहा ते बारा जणांच्या टोळक्याने भाडेकरूला घरात घुसून बेदम मारहाण केली. तसेच घर खाली न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना ६ जून रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सातारा परिसरातील तिरूपती हॉरिझन सोसायटी येथे घडली.

जनार्दन विश्वास मावसकर (वय ५६, रा.तिरूपती हॉरिझन सोसायटी, सातारा परिसर) व बबलू पठाडे यांच्यात घर खाली करण्याच्या कारणावरून गेल्या काही दिवसापासून वाद सुरू आहे. रविवारी रात्री मावसकर कुटुंबिय घरात असतांना गिवर्गीस सक्रीया मॅथ्यु बबलू (रा.ज्योतीनगर, मुथुट कॉर्नर), बबलू पठाडे यांच्यासह तीन महिला व पाच पुरूषांनी जनार्दन मावसकर यांच्या घरात प्रवेश केला.

यावेळी घरात घुसलेल्या टोळक्याने घर खाली करा असे म्हणत जनार्दन मावसकर यांच्यासह त्यांचा मुलगा संजय मावसकर याला शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी जनार्दन मावसकर यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र मारहाण करणाऱ्या महिलांनी हिसकावून नेले. जनार्दन मावसकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या टोळक्याविरूध्द सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक विक्रम वडणे करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

IMP