लग्नाचा खर्च वाचवण्यासाठी शेतक-याच्या मुलीची आत्महत्या

आई-वडलांनी शिक्षणासाठी सोनं गहाण ठेवले, हुंड्याचा खर्च नको म्हणून 'तिने' संपवली जीवनयात्रा

औरंगाबाद – राज्यात आधीच कर्जबाजारीपणामुळं शेतकरी आत्महत्या थांबण्याचं नाव घेईनात आणि आता शेतक-यांच्या मुलांच्या आत्महत्याही समोर येत आहेत. राज्यात आतापर्यंत ही शेतकऱ्यांच्या मुलांची तिसरी आत्महत्या आहे लग्नाचा खर्च वाचवण्यासाठी शेतक-याच्या मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे.

bagdure

वर्षा कैलास राठोड असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव असून ती मूळची जालना जिल्ह्यातील अंबडची रहिवासी होती. ती औरंगाबादमध्ये बी.कॉमच्या तिस-या वर्षाला शिकत होती. मात्र तृतीय वर्षात नापास झाल्यामुळं ती निराश झाल्याचंही आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केलंय. आई-वडलांनी शिक्षणासाठी सोनं गहाण टाकून खर्च केला. आता लग्नासाठीही हुंड्याचा खर्च करावा लागेल. ते आपल्याला नको असल्याचं गळफास लावून आत्महत्या करत असल्याचं वर्षानं चिठ्ठीत लिहिलंय. राज्यात किंबहुना माराठवडयात शेतकऱ्यांची अवस्था गंभीर असल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय..

You might also like
Comments
Loading...