परभणी : शहरातील नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्वतःच्या टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याकरिता सर्वसामान्य नागरिकांची जीवित वा व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृत्ये, दुखापतीसह खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्रानिशी मारहाणीसह दंग्याचे प्रकार सातत्याने करणाऱ्याया गुंडांच्या टोळीस जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना यांनी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
यामध्ये टोळीप्रमुख लक्ष्मण गायकवाड, अनिल गायकवाड यांना सहा महिने तर टोळी सदस्य सुरेश पवार, आकाश जाधव यांना तीन महिन्यांच्या कालावधीकरिता जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने या टोळीस जालना तसेच माजलगाव येथे नेऊन सोडण्यात आले आहे.
या टोळीतील सदस्यांनी २०१४ पासून आजतागायत लक्ष्मण गायकवाड, अनिल गायकवाड, सुरेश पवार, आकाश जाधव, दिलीप जाधव, मारोती जाधव, करण जाधव, शिवाजी जाधव आदी सदस्यांमार्फत वैयक्तीक तसेच एकत्रित गुन्हे घडवून सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवितास, मालमत्तेस धोका निर्माण केला. या टोळीविरूद्ध एकूण १३ गुन्हे दाखल झाले आहेत. नवनवीन सदस्यांना टोळीत सामावून घेत गुन्हे करण्याचे टोळीचे कृत्य नेहमी सुरू होते.
दरम्यान चार महिन्यांच्या कालावधीत पिंपळदरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विलास मुंडे, नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नितेश उर्फ भैय्या प्रकाश देशमुख यांच्या टोळीतील टोळी प्रमुखांसह दहा सदस्यांना व चालू हद्दपार कारवाईत चार अशा एकूण १४ गुंडांना आतापर्यंत हद्दपार केले.
महत्वाच्या बातम्या :
- कोरोनाचा इफेक्ट! औरंगाबादेत आजपासून रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी
- वैद्यकीय महाविद्यालयासाठी मुख्यमंत्र्यांना परभणीतून लाखो एसएमएस
- बिगबॉसच्या घरातील ‘या’ आभिनेत्रीने लावले मानधन थकवल्याचे आरोप
- सोशल मीडियावर ब्रह्मज्ञान, निवडणूक अर्ज भरताना कोरडे पाषाण!
- गुन्ह्यापासून वाचण्यासाठी समाजाची ढाल पुढे केली जात आहे ;आशिष शेलार यांची टीका