आरे कॉलनीच्या जंगलात आग लागली की लावली?

मुंबई – मुंबईत गोरेगावमधल्या आरे कॉलनी परिसरातील डोंगराला काल लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. काल संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास इथल्या आय टी पार्क परिसराजवळ असलेल्या खासगी विकासकाच्या ताब्यातील डोंगरावर आग लागली. वाऱ्यामुळे आग पसरत गेली. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या आणि सात पाण्याचे टँकर आणि तीन जलद प्रतिसाद वाहनं आग विझवण्यासाठी कार्यरत होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असं मुख्य अग्निशमन अधिकारी पी. एस. रहांगडले यांनी सांगितलं.

Rohan Deshmukh

दरम्यान, या आगीतून आता संशयाचा धूर उठण्यास सुरुवात झाली आहे. आरे कॉलनीच्या जंगलात लागलेल्या आगीतून संशयाचा धूर येत आहे. आग लागली की लावली? याबाबत वनखात्याने तात्काळ चौकशी करावी अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे. तसेच या आगीसंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं कदम यांनी सांगितलं.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...