बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानी मीटर बॉक्सला आग

Babasaheb Purandare
पुणे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पर्वती पायथा येथे असलेल्या निवास्थानी  मीटर बॉक्सला आग लागल्याची घटना घड्लीये . पहाटे चारच्या सुमारास मीटर  बॉक्सने अचानक पेट घेतला. घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पहाटे चार वाजता अग्निशमन दलाकडे स्वत: बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या घरी मीटर बॉक्सला आग लागली असून मदतीची मागणी केली. त्याचवेळी अग्निशमन मुख्यालयातून लगेचच दोन वाहने रवाना करण्यात आली. घटनास्थळी मीटर बॉक्स बसवलेले लाकूड व मीटर बॉक्स हे जळाले होते. अग्निशमन दलाचे जवान व महाराष्ट्र राज्य विद्यूत मंडळाचे कर्मचारी तसेच पोलिसांनी तातडीने धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट होऊन आग लागली की अन्य काही कारण असेल याचा तपास अग्निशमन दल व पोलिस करीत असून मोठा अनर्थ टळल्याने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी तातडीने उपस्थित झालेले अग्निशमन दल, पोलिस विभाग, विद्यूत मंडळ यी यंत्रणेचे मनपुर्वक आभार मानले आहेत.