म्हणून त्याने पेटवली तब्बल २७ वाहने

fire broke 27 vehical pune

पुणे : पुण्यामध्ये सुरु असणारे वाहनांचे जळीतकांड थांबताना दिसत नाहीये, रविवारी रात्री जनता वसाहत गल्ली क्र. ३८ येथील पोलीस चौकीच्या जवळच असणाऱ्या मोकळ्या जागेत लावलेली तब्बल २७ वाहने जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. अचानक हे जळीतकांड घडल्याने परिसरात एकच खळबळ निर्माण झाली होती. यामध्ये टेम्पो, दुचाकी व सायकल अशी एकूण २७ वाहने जाळून खाक झाली.

दरम्यान  हे सारे कृत्य एका 25 वर्षीय माथेफिरुने दारूच्या नशेत केल्याच उघड झाल आहे. दिनेश ऊर्फ झब्ब्या हरी पाटील( वय 25) असे आरोपीचे नाव आहे.  जनता वसाहत गल्ली क्रमांक  जवळ स्वच्छतागृहाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात उभा असलेल्या एका दुचाकीला दिनेशने नशेत पेटवले. या गाडीने पेट घेताच हि आग इतर गाड्यानी पकडली. त्यामुळे झालेल्या जळीत कांडात 1 टेम्पो, 24 दुचाकी व 2 सायकल जाळून खाक झाली आहेत. या घटनेचा तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.