शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सोडविण्यासाठी महाशिव आघाडी निर्मितीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशा राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली.

या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ नेते अजित पवार, छगन भुजबळ आणि इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी राष्ट्र्वादीचे ज्येष्ठ नेत नवाब मलिक यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ते म्हणाले, ” या बैठकीत राज्यातील एकूण राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. राज्यात राष्ट्रपती राजवट असताना राज्यात एक स्थिर पर्यायी सरकार स्थापन करायचे आहे. असा निष्कर्ष काढण्यात आला.”

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी उद्या शरद पवार दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करून महाशिव आघाडीबाबत पुढील निर्णय घेतला जाईल. त्यानंतर सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या भेटीनंतर मंगळवारी दोन्ही पक्षाचे नेते चर्चा करून निर्णय घेतील. असेही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या