सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली यांच्यात झालं कडाक्याचं भांडण..?

shiddharth

मुंबई : प्रेमापासून ते सप्तपदी घेऊन एकत्र आयुष्याला सुरुवात करणारी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर ही जोडी. त्यांचा आजवरचा गोड प्रवास आपण पाहिला आहे, मात्र या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण होतंय..असं सांगीतल्यावर विश्वास बसणार नाही. काय आहे हे प्रकरण आपण बघू या.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडप म्हणून या दोघांकडे बघितलं जातं. मात्र या व्हिडिओमध्ये  मिताली आणि सिद्धार्थ जोरजोरात भांडत असतात. त्यांचं हे भांडण सिद्धार्थने अंघोळ झाल्यावर ओला टॉवेल बेडवर टाकल्यामुळे झाले आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ कॅमेरासमोर काहीतरी बोलत असतो. त्यावेळी मिताली येते आणि टॉवेल तिथे टाकला म्हणून भांडत असते. त्यावेळी सिद्धार्थ देखील म्हणतो की, ‘एकदा टाकला तर काय झालं.’ यानंतर त्यांच्यात खूप भांडणं होतात आणि रागात मिताली त्याला ‘शटअप,’ असे म्हणते. यावर सिद्धार्थ ‘अँड बेंड ओव्हर,’ असे म्हणून डान्स स्टेप्स करतो आणि टॉवेल उचलून तेथून निघून जातो. नुकतच मितालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे.

यानंतर मिताली डोक्यालाच हात लावते. त्याच्या या मजेशीर व्हिडिओवर जुईली जोगळेकर, रोहित राऊत, नचिकेत लेले यांच्यासह अनेक सेलिब्रिटी व चाहत्यांनी कमेंट केली. मराठी चित्रपटसृष्टीत मितालीने आजवर उर्फी, फ्रेशर्स, ‘घेतला वसा टाकू नको’ अश बऱ्याच चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले.तसेच सिद्धार्थ चांदेकर ने ‘झेंडा’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. यानंतर क्लासमेट, वजनदार, झिम्मा, हिरकणी यांसारख्या चित्रपटात काम केले. तर ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेत देखील काम केले आहे. मात्र या दोघांचा व्हिडिओ बघून मात्र मनोरंजन नक्कीच होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या