भूमी अभिलेख अधीक्षकास शेतक-याची चाबकाने मारहाण

mother,son,attack,sangali

लातुर : अंबाजोगाई बसस्थानकावर शेतक-याने भूमी अभिलेख अधीक्षकास चाबकाने मारहाण केल्याची घटना आज सकाळी घडली असून या प्रकरणी शेतक-यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रामधन दादाराव केंद्रे (रा. होळ, ता. केज) यांनी भूमी अभिलेख अधीक्षक गरकळ यांना बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर अडवून शिवीगाळ करत चाबकाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शेताची मोजणी मनाप्रमाणे केली नसल्याचा राग धरून ही मारहाण केली या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.