कधीकाळी पान टपरी चालवणारे भाऊ कदम आज आहेत मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत

bhau kadam

मुंबई : भालचंद्र पांडुरंग कदम हे भाऊ कदम म्हणून लोकप्रिय आहेत. भाऊ हे मराठी चित्रपट अभिनेते आणि प्रसिद्ध विनोदवीर आहेत. विशेषतः कदम हे व्यावसायिक मराठी चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये काम करत असतात. १९९१ मध्ये त्यांनी नाटकात काम केले व येथून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात झाली. फू बाई फू आणि चला हवा येवू द्या यामधील भूमिकांबद्दल ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी ९ पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केले आहे आणि ५०० हून अधिक नाटक प्रयोगांमध्ये काम केले आहे.

वडाळ्याच्या बीपीटी कॉलनीत भाऊ कदम यांचा जन्म झाला. पुढील शिक्षणही तेथेच झाले आणि मुंबई म्हणजे नेमके काय, हे समजत गेले. वडिलांची नोकरी बिपीटीत असल्याने त्यांच्याच क्वार्टर्समध्ये बालपण गेले. त्यामुळे वीज, पाणी हा सगळा खर्च कंपनीतर्फे केला जाई. अर्थात तोपर्यंत घराची सगळीच जबाबदारी वडिलांच्या खांद्यावर असल्याने निर्धास्तपणे जगत होतो. पण वडिलांच्या निधनानंतर अचानक परिस्थिती बदलली.

#lockdown : कायदा व सुव्यवस्था चोख ठेवावी; अनिल देशमुख यांचे आदेश

वडिलांच्या निधनानंतर ते डोंबिवलीत शिफ्ट झाले. यानंतर त्यांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.सुरुवातीला घर खर्चासाठी मतदार नावे नोंदणीचे काम देखील भाऊ कदम यांना करावे लागले. जगण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याने भावाच्या साथीने पानाची टपरी सुरू केली होती. झी चोवीस तासने याबाबत मागे एक लेख प्रसिद्ध केला होता त्यात या बाबीचा उल्लेख केला होता. दरम्यान, एवढा मोठा संघर्ष सुरु असताना याकाळात देखील त्यांनी स्वतःमधील अभिनेता जिवंत ठेवला.

एकेकाळी करिअरमध्ये मोठी संधी मिळत नसल्याचे पाहून त्यांनी अभिनयाला रामराम ठोकण्याचाही विचार केला होता. मात्र त्याचकाळात विजय निकम यांनी त्यांना ‘जाऊ तिथे खाऊ’ या नाटकात मुख्य भूमिका दिली. हे नाटक त्यांच्या करिअर साठी मैलाचा दगड ठरला. पुढे भाऊ ‘फू बाई फू’च्या सहाव्या पर्वाचे ते विजेतेसुद्धा ठरले. चला हवा येवू द्या या मालिकेत त्यांनी पप्पू, ज्योतिषी आणि अनेक विविध वर्णनांचे चरित्रभूमिका केल्या. अभिनयातील जवळजवळ प्रत्येक भूमिकेत आपला एक वेगळा ठसा उमटवला. आज भाऊ कदम हे महाराष्ट्रातील घराघरात पोहचले असून मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनले आहे.

‘खा. वंदना चव्हाण, सुळे, बारणे, बापट यांनी केंद्राकडून अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न करावेत’

मुंबईत संस्थात्मक क्वारंटाईनसाठी आक्रमकपणे पावले उचलणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे