‘कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवरच भुंकतो’; भातखळकरांचा पलटवार

bhatkhalkar

मुंबई : मुंबईमध्ये गेले दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने जीर्ण व धोकादायक इमारतींमधील रहिवास्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा मुंबई महापालिकेने दिला होता. दरम्यान, मालाडमधील मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास इमारत कोसळून दुर्घटना घडली. एक दुमजली घर अचानक नजीकच्या दुमजली इमारतीवर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली सापडलेल्या ११ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १७ जणांना ढिगाऱ्याखालून वाचवण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेत ७ जणं गंभीर जखमी आहेत. आधीच मुंबईची तुंबई झाल्याने भाजपने महापालिकेतील सत्तापक्ष असलेल्या शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. त्यातच या दुर्घटनेनंतर भाजपने पुन्हा एकदा शिवसेना व मुंबई महापालिकेवर निशाणा साधला.

भाजपच्या टीकेला शिवसेना नेत्या व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बोचऱ्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. मालाडमध्ये झालेल्या दुर्घटनेची माहिती घेण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपच्या आरोपांबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं. ‘भाजप काय म्हणतंय ? भौ भौ काय करायचं ते त्यांना करत राहू दे. कारण शिवसेना हे करते ते करते असं ते सांगत आहेत. हे अगदी दूध के धुले आहेत नो प्रॉब्लेम,’ असा खोचक टोला किशोरी पेडणेकर यांनी काढला आहे. यामुळे पेडणेकरांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पेडणेकरांवर पलटवार केला आहे. ‘मा.महापौर किशोरी पेडणेकर यांचे हे वक्तव्य त्यांचे संस्कार आणि पक्षाची संस्कृती दाखवणारे आहे. महत्वाचे म्हणजे कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो हे लक्षात असू दे,’ असा चिमटा भातखळकर यांनी ट्विटद्वारे काढला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP