आक्रमक, रांगडया शैलीतील भाषणाने आ.धस यांनी विधिमंडळात लक्ष वेधले

बीड : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात बीड जिल्ह्यातील आष्टीचे विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी विविध प्रश्नांवरून महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला. कोरोना काळातील भ्रष्टाचार आणि कोरोनाशी लढताना अपयशी ठरलेले सरकार यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. त्यांनी अभ्यासपुर्ण परंतु आपल्या नेहमीच्याच आक्रमक व रांगडया शैलीत भाषण करीत या भागातील विविध विषय मांडून सभागृहाचे लक्ष वेधले.

भाजप आ.सुरेश धस विधिमंडळात म्हणाले की, कोरोनाचे महासंकट सुरू असताना केलेल्या कामाविषयी सरकार स्वतःच आपली स्तुती करून घेण्याचे काम करीत आहे. मात्र आम्हीही त्या काळात रात्री अपरात्री स्वतः रस्त्यावर उतरून लोकांना मदत केली आहे. त्यामुळे कोरोना वॉरियर्सच्या प्राथमिकतेत लस देण्यासाठी विधानसभा व विधान परिषद सदस्यांचाही नंबर लागावा, सरकारने या कोविड काळात कोणते चांगले काम केले ? उलट या कोरोनामुळे खासगी हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी गोरगरिबांना मंगळसूत्र मोडण्याची वेळ आली. या हॉस्पिटलचे ऑडिट सरकारने ज्यांचा या क्षेत्राशी काही संबंध नाही अशा महसूल विभागाकडे दिले, टाळेबंदीत लोकांवर पायी प्रवासाची वेळ आणली. ऊसतोडणी कामगारांना मार देऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.

अतिवृष्टी नुकसान भरपाईतही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असे सर्व असतानाही आमचे शासन म्हणुन तुम्ही स्वतःच आपली स्तुती करून घेत आहात. पूजा चव्हण प्रकरणामुळे महिलांविषयी त्यांच्या सुरक्षिता व न्यायाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. इतकी गोंधळलेले सरकार असताना कोणती चांगली काम केली असा सवाल करीत आ. सुरेश धस यांनी सरकारवर टिकेची तोफ डागली व अभ्यासपुर्ण भाषणाने आ. सुरेश धसांनी सभागृह गाजवत कोरोना सह अनेक मुद्यांवरून सरकारवर घणाघाती टीका केली.

महत्वाच्या बातम्या