fbpx

ब्राम्हण समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली पंकजा मुंडेंची भेट

बीड – राज्यातील ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी 22 जानेवारी 2019 रोजी मुंंबई येथे आझाद मैदानावर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या ग्रामविकास,महिला व बालकल्याण मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांची समाजाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

सद्य परिस्थिती महाराष्ट्र राज्यातील ब्राह्मण समाज अत्यंत अवघड परिस्थितीत जीवन जगत आहे. अत्यंत शांतताप्रिय,संयमी,आणि शिस्तप्रिय असणाऱ्या या समाजाला अनेक सामजिक,आर्थिक व शैक्षणिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्यातील ब्राह्मण समाज एकवटला असून एक ब्राह्मण-नेक ब्राह्मण हे ब्रीद घेऊन सकल ब्राह्मण समाजाने वज्रमुठ बांधली आहे.

दरम्यान, 22 जानेवारी 2019 रोजी मुंबई येथे आझाद मैदानात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. समाजातील महिला, पुरुष,सुशिक्षित बेरोजगार युवक,युवती जेष्ठ नागरिक या धरणे आंदोलनास उपस्थित राहणार आहेत. याच धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांची समाजाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली . यावेळी अँड.रवी देशमुख,जेष्ठ पत्रकार महेश वाघमारे, प्रमोदजी पुसरेकर, अँड.अजिंक्य पांडव, विश्वजित सेलमोहकार, अँड.समीर पाटोदकर, राजाभाऊ सेहलमोहकर, बाळासाहेब जोशी आदी मंडळी उपस्थित होते.

या शिष्टमंडळा सोबत ब्राह्मण समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करावे, मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधांची खरी परिस्थिती,इतर समजाला देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलती यात असणारी तफावत,सुशिक्षित बेरोजगार युवक यांच्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची गरज,पुरोहित लोकांना मानधन आदी समस्या आणि मागण्या याबाबत सविस्तर चर्चा केली. याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत सरकार सर्वांच्या सोबत आहे असा शब्द दिला .