मतदानाच्या एकदिवस आधी मुस्लीम मतं कॉंग्रेसकडे वळली, निकालापूर्वीच ‘या’ नेत्याने मैदान सोडले

टीम महाराष्ट्र देशा: आम आदमी पक्षाला दिल्लीमध्ये सातही जागा मिळवण्यासाठी आम्ही आग्रही होतो, मात्र मतदानाच्या एकदिवस अगोदर ही 12 ते 13 टक्के असणारी मुस्लिम मतं काँग्रेसकडे वळली, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. मुस्लीम मतं कॉंग्रेसकडे वळल्याने निकालावर परिणाम होणार असल्याचं देखील इंडियन एक्सप्रेसशी बोलताना केजरीवाल म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्यातील मतदान उद्या पार पडणार आहे, तत्पूर्वी कोणाची सत्ता दिल्लीवर येणार याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. दिल्लीमध्ये २०१४ साली सर्व सात जागांवर भाजपला विजय मिळाला होता. यंदा मात्र भाजपला कॉंग्रेससह आपचे तगडे आव्हान असल्याचं दिसून आले. आता केजरीवाल यांनी केलेल्या विधानामुळे आपने निकाला पूर्वीच मैदान सोडल्याचं दिसत आहे.

Loading...

निकालानंतर मोदी – शहा जोडीशिवाय सत्ता स्थापन करण्यास कुणी पुढे आल्यास त्याला पाठिंबा देणार आहे, ईव्हीएमशी छेडछाड न झाल्यास भाजप पुन्हा सरकारमध्ये येणं कठिण आहे, असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली