पंकजा मुंडेंच्याविरोधात षडयंत्र रचलं जातयं : राम शिंदे

Ram-Shinde-

टीम महाराष्ट्र देशा : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत 12 डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आपली पुढील दिशा स्पष्ट करण्याचं जाहीर केलं. त्यांच्या या फेसबुक पोस्ट नंतर झालेला घटनाक्रम पाहता पंकजा मुंडेंच्याविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.

आज दुपारी विनोद तावडे यांच्यासोबत राम शिंदे यांनी पंकजा मुंडेची भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले, “गोपीनाथ गडावर सालाबादप्रमाणे दरवर्षी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम असतो. त्या अनुषंगानेच पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर घोषणा केली. त्या दरवर्षीच अशी घोषणा करतात. या दिवशी त्या वर्षभरासाठी एक वेगळी दिशा देत असतात. तशीच ही घोषणा होती. मात्र, माध्यमांनी त्यांच्या या घोषणेचा विपर्यास केला. त्यामुळे त्या व्यथित झाल्या आहेत.”

“हा गोपीनाथ मुंडे यांचा परिवार आहे. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला संपूर्ण महाराष्ट्रात नेलं. अशा नेत्याच्या पंकजा मुंडे कन्या आहेत. अनेक मतदारसंघात त्यांना बोलावणं असतं, त्या तेथे जातात. त्यांचे मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत. त्यामुळे अशाप्रकारे त्यांना दुःखी करण्याचं किंवा व्यथित करण्याचं षडयंत्र कोणीतरी रचलं आहे. योग्य त्या वेळी पंकजा मुंडे त्यांची भूमिका जाहीर करतील.”

महत्त्वाच्या बातम्या :

Loading...