आयपीएलपूर्वीचं कोच कुंबळे आणि वसीम जाफर यांनी रंगवली गाण्याची मैफिल

kuble

मुंबई : आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होत आहे. मे महिन्यातील पहिला टप्पा पंजाब किंग्स संघासाठी फारसा चांगला झाला नव्हता. आता मात्र त्यांना कामगिरी सुधारण्याची दुसरी संधी मिळाली आहे. दुबई येथे सुरु होणाऱ्या या हंगामासाठी सांग सरावाला लागले आहेत. मात्र सरावासोबत पंजाब किंग्सच्या व्यवस्थापनाने संघासाठी एका मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यात कोचेसचा हटके अंदाज दिसला आहे.

माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे हेड कोच अनिल कुंबळे यांनी ही मैफिल खऱ्या अर्थाने गाजवली. नेहमी शांत आणि गंभीर दिसणाऱ्या कुंबळे यांनी या कार्यक्रमात रोमँटिक गाणे गात सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले. त्यांना बॅटिंग कोच वसीफ जाफर यांनी साथ दिली. या दोघांनी “कभी अलविदा ना केहना” हे गाणे गायले. पंजाब किंग्सने हा व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

दोन महान खेळाडू एका वेगळ्या खेळपट्टीवर असा संदेश असलेला हा वसीम आणि कुंबळे यांच्या गाण्याचा व्हिडीओ चाहत्यांकडून मोठ्या संख्येने शेअर केला जात आहे. स्पर्धा सूरु होण्याआधी संघात चांगले वातावरण तयार होण्यासाठी केला गेलेला हा कार्यक्रम सगळ्यांनाच भावला आहे. पंजाब किंग्सचा दुसऱ्या हंगामातील पहिला सामना २१ सप्टेंबरला राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या