बंद काळात एसटीवर दगडफेक प्रकरणी चौघांंवर गुन्हा दाखल

सोलापूर : महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभूमीवर सोलापुरातही बुधवारी बंद पाळण्यात आला होता. यामध्ये ८५ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडण्यात आले. बंद काळात एम एच १४, बीटी ३३७५ या एसटी गाडीवर दगडफेक करून नुकसान केल्याप्रकरणी धनराज धनदाडे, मलय सिद्धगणेश, शुभम भालेराव, अजय शिंदे या चौघांवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत बुधवारी आंदोलन करण्यास कोणालाही परवानगी दिली नव्हती. तरी काहींनी आंदोलन केली.

You might also like
Comments
Loading...