कबीर कला मंचाच्या सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

elgar parishad pune

पुणे : पुण्यातील शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर राेजी घेण्यात अालेल्या एल्गार परिषदेत अायाेजक व कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांनी दाेन समाजात तेढ निर्माण करणारी भाषणे करून पत्रके, पुस्तिका, पथनाट्य सादर केली हाेती. याची परिणीती म्हणून काेरेगाव भीमा व परिसरात दगडफेक, हिंसाचार व जाळपाेळ झाली. त्यानंतर महाराष्ट्रात दंगल उसळली, अशी तक्रार पाेलिसांना दाखल झाली अाहे. याप्रकरणी पाेलिसांनी कबीर कला मंचाच्या सहा जणांविराेधात विश्रामबाग पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला अाहे.

सुधीर ढवळे, सूत्र संचालन करणारे सागर गाेरखे व त्याचे अन्य कलाकार, हर्षाली पाेतदार, रमेश गायचाेर, दीपक डेंगळे, ज्याेती जगताप अशी गुन्हा दाखल झालेल्या अाराेपींची नावे अाहेत. याबाबत पाेलिसांकडे तुषार रमेश दामगुडे यांनी फिर्याद दिली अाहे. सदर कार्यकर्त्यांनी एल्गार परिषदेत कबीर कला मंचाचे भाषण, दिशाभूल करणारा इतिहास, प्रक्षाेभक गाणी, पथनाट्य सादर केले हाेते. प्रतिबंधित सीपीअाय(माअाेवादी) या संघटनेचे असे धाेरण अाहे की, दलित समाजाची दिशाभूल करून त्यांच्या मनात जहाल माअाेवादी विचारांचा म्हणजेच संविधानिक नाहीतर हिंसाचाराच्या मार्गाने जाण्याच्या विचारांचा प्रचार करणे असा हेतू आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
रावसाहेब दानवेंचे जावई मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का