अमृता फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या विरोधात तक्रार दाखल

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर फेसबुक च्या माध्यमातून अतिशय खालच्या पातळीवर टीका करून बदनामी करणाऱ्या सिद्धेश मुटकुळे (मु.पो.आष्टी) या युवका विरोधात काल पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये सामाजिक कार्यकर्ते अंकित काणे यांनी तक्रार दाखल केली आहे.

अंकित काणे यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे पण गुन्हा दाखल करण्यासाठी सायबर सेल कडूनही पोलिसांना मदत घ्यावी लागणार आहे. सायबर सेल कडून त्या युवकाची पूर्ण माहिती आली की गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

काही युवक सोशल मीडियावर खालच्या भाषेत टीका करून अनेक महिलांचा अपमान करतात. कुठल्याही महिलेची अशी बदनामी होणे ही फार गंभीर बाब आहे. अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष केल्यास हे प्रकार अधिक वाढू शकतात त्यामुळे यांना कायदेशीर पद्धतीने धडा शिकवणे आवश्यक आहे असं अंकित काणे यांचे म्हनणे आहे.

दरम्यान, राजकारण बाजूला ठेवून महिलांचा सन्मान करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. आज समाजामध्ये कोणत्याही गोष्टीचा संदर्भ नसताना अत्यंत खालच्या स्तराला जाऊन टीका होताना पाहायला मिळत आहे. या गोष्टींना आळा बसवण्यासाठी अंकित काणे यांनी हे पाऊल उचलले आहे.