राष्ट्रवादीच्या बड्या आमदाराविरोधात खंडणीखोरीची तक्रार

ncp

टीम महाराष्ट्र देशा : बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याची तक्रार दाखल झाली आहे. बीडचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. नरहरी शेळके यांनी अमरसिंह पंडित यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली आहे. पंडित यांचे स्वीय सहाय्यक जालिंदर राऊत यांनी धमकी दिल्याचे तर पंडित यांनी खंडणी मागितल्याचेा आरोप डॉ. नरहरी शेळके यांनी केला आहे.

दरम्यान, ‘पंडित हे महसूल मंत्र्यांकडे तुमच्याविरुद्ध तक्रार करणार आहेत. तेव्हा त्यांची भेट घेऊन तोडपाणी करा,’ असा निरोप सुभाष पाटील नावाच्या व्यक्तिने आपल्याकडे पोहचवला होता, असे शेळके यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन चौकशी करावी, अशी मागणी शेळके यांनी केली आहे.

1 Comment

Click here to post a comment