पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समस्या सोडविण्यासाठी समितीची स्थापना करणार

पुणे : पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समस्या सोडविण्यासाठी समिती गठीत करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. बैठकीला प्रतापराव पवार, प्रा. धांडे, प्रा. पासलकर, कमांडर खांडेकर तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्रालयात पुणे स्वायत्त संस्थेच्या प्रगतीबाबत व अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे या संस्थेस महाराष्ट्र विधानमंडळाकडून अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे कायदा – २०२० द्वारे विशेष दर्जा बहाल करणेबाबत कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.

Loading...

सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाविद्यालयामध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. याबाबतच्या सर्व अडचणींचा अभ्यास करून शिफारस करावी. या शिफारसीनुसार शासन विद्यार्थ्यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेईल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
एकनाथ खड्सेंचे निर्दोषत्व सिद्ध झाल्यास ; फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ?
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत