fbpx

पुलवामात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत २ दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. या भागात अजूनही काही दहशतवादी गोळीबार करत आहेत. त्यामुळे सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यातील चकमक सुरु आहे.

या चकमकीत हिजबूल मुजाहिद्दीन या संघटनेचा दहशतवादी शौकत अहमद धरचा भारतीय जवानांनी खात्मा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंजगाम सेक्टरमध्ये काही दहशतवादी लपल्याची माहित होती. रात्री २ वाजताच्या सुमारास सुरक्षा दलांनी या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु केले. सुरक्षा दलाच्या जवानांना पाहताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. या गोळीबाराला भारतीय सुरक्षा दलाने जोरदार प्रत्युत्तर दिलं.