उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ समजावून सांगणाऱ्यास मनसेकडून 151 रुपयांचे रोख बक्षीस

टीम महाराष्ट्र देशा : पंढरपूर येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात लाखो शिवसैनिकांच्या उपस्थिती मध्ये राम मंदिराचा मुद्दा अग्रस्थानी ठेऊन शेतकरी , दुष्काळ , हिंदुत्व या मुद्द्यांना हात घालत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण ठोकले , पण त्या भाषणाची मात्र मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरेंचं भाषण समजावून सांगणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिले जाईल, असं देशपांडे यांनी म्हटलंय.

पंढरपूर येथील भाषणात उद्धव ठाकरेंनी अनेक विषयांना स्पर्श करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली. तर आगामी निवडणुकांच्या युतीबाबतही त्यांनी भाष्य करताना ‘युती करायची की नाही हे जनताच ठरवेल, आम्हाला कुठल्याही फॉर्म्युल्यात रस नाही,’ असे म्हंटले. त्यावर , मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंचं भाषण समजण्यापलीकडचं असल्याचं म्हटलंय. कारण युती बाबत केलेले भाष्य हे संभ्रमात टाकणारे आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ समजावून सांगणाऱ्यास मनसेकडून 151 रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल, असे देशपांडे यांनी म्हटले. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर सोशल मीडियावरही चर्चा देखील रंगली होती.