उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पंढरपुरातील ‘त्या’ सभेच्या आयोजकांवर अखेर गुन्हा झाला दाखल

ajit pawar

पंढरपूर – पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर, भाजपने भगीरथ भालके यांच्या विरोधात समाधान आवताडे मैदानात उतरवलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात मुख्य सामना होणार आहे.

दरम्यान,काल भाजप नेते कल्याणराव काळे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत तौबा गर्दी जमवत कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. पंढरपुरात अजित पवारांच्या सभेत तुफान गर्दी झाली होती.यामुळे कोरोना नियमांचा भंग झाला होता. याप्रकरणी आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 188 नुसार पंढरपूर शहर पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. त्यात काही ठिकाणी वाढत्या रुग्णांना आरोग्य सेवा पुरवताना शासन आणि प्रशानसनावर प्रचंड ताण येत आहे. सरकारी यंत्रणा हतबल ठरत आहेत. वाढत्या मृत्यूदराबरोबरच भीतीही वाढत आहे.

दरम्यान,महाराष्ट्रात काल 2 लाख 36 हजार 815 कोरोना चाचण्या झाल्या त्यात 56 हजार 286 नवीन कोरोनाबाधित आढळले चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं हे प्रमाण 23 पुर्णांक 76 शतांश टक्के आहे. आतापर्यंतच्या एकंदर बाधितांची संख्या आता 32 लाख 29 हजार 547 झाली आहे. दैनंदिन बाधितांची संख्या कमी होण्याची चिन्हं दिसत नसली तरी दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र वाढते आहे.

एका बाजूला महाराष्ट्र सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी टाळेबंदी करण्यात आली असून संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध लावून सर्वसामन्यांना नियमांचे पालन करायला राज्यकर्ते सांगत आहेत. दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्रीच जर अशा पद्धतीने नियम मोडत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी पाहायचे कुणाकडे असा सवाल उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :