शरद पवारांच्या विरोधात सोशल मिडीयावर बदनामकारक पोस्ट टाकल्याने निलंग्यात गुन्हा दाखल

निलंगा/प्रदीप मुरमे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या विरोधात सोशल मिडीयावर बदनामकारक खोटी पोस्ट टाकल्याने निलंगा शहरातील शरद पेठकर यांच्या विरोधात निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याच्या घटनेने शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

नागपुरात इलेक्ट्रिक बस वाहतुकीचा मार्ग मोकळा, ४० इलेक्ट्रिक बस होणार परिवहन सेवेत रूजू

खा.पवार यांच्या विरोधात शरद पेठकर यांनी २६ जून रोजी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन व निलंगा नगरी या व्हाट्सअप ग्रूपवरुन बदनामकारक खोटी पोस्ट टाकून व्देषभावना निर्माण करणारी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली आहे.याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते धम्मानंद काळे यांनी येथील पोलिसात तक्रार दाखल केली होती.

…तर नागपुरात नगरसेवकांसोबत महापौरही बसणार उपोषणाला

या तक्रारीवरुन शरद पेठकर यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.शरद पेठकर हे भाजपचे कार्यकर्ते असून पालिकेचे स्वच्छता व आरोग्य सभापती आहेत.पो.उपनिरीक्षक जी.जे.क्षीरसागर पुढील तपास करीत आहेत.

IMP