राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल

अमळनेर: सोशल मिडियावर कटकारस्थान करीत बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जिल्हा बँकचे संचालक अनिल भाईदास पाटील, आणि माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी यांच्या विरोद्धात भाजप चे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या फिर्यादी वरून पोलिसात गुन्हा नोंदिवण्यात आला.

या फिर्यादीत वाघ यांनी असे म्हटले कि, दि.१८ जून रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षचे प्रवक्ते नवाब मलिक हे माझ्या विरुद्ध प्रसार माध्यमावर मुलाखत देताना दिसून आले. त्यात त्यांनी माझ्यावर १० लाख रुपयांची रक्कम घेतल्याचा आरोप करीत बदनामी केली. हि बनावट चित्रफित माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी यांनी कटकारस्थान करून व्हायरल केल्याचे समजून आले. राष्ट्रवादी कॉंग्रसचे अनिल भाईदास पाटील यांनी बदनामी करीत वृत्तपत्रात खोट्या बातम्या पसरविल्या. लालचंद सैनानी यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केल्यामुळे त्यांनी हे कृत्य केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर करीत आहे.