जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केल्याप्रकरणी बाळासाहेब नाहटा यांच्या विरोधात गुन्हा दाखल

balasaheb nahata

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव, अकोले व श्रीगोंदा ह्या तालुक्यात यापूर्वीच लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचे सावट घोंगावत असताना लोणी व्यंकनाथ विविध कार्यकारी सोसायटीचे कार्यालय येथे शेतकर्‍यांना भव्य कर्ज वाटप मेळावा घेतला जाणार असल्याची माहिती रिक्षामधून गावामध्ये मोठा आवाज करून दिली जात असल्याची बाब श्रीगोंदा पोलिस पथकाच्या निदर्शनास आल्याने दोघांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी व्यंकनाथ विविध कार्यकारी सोसायटी आणि अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यावतीने दि.१५ सप्टेंबर रोजी शेतकर्‍यांसाठी भव्य कर्ज वाटप मेळावा आयोजित करण्यात आला होता. श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहटा यांच्या सांगण्यावरून रविंद्र अशोक बोरुडे यांनी दि.१४ सप्टेंबर रोजी रिक्षामधून गावामध्ये मोठा आवाज करून लोणी व्यंकनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे कार्यालय येथे शेतकर्‍यांना भव्य कर्ज वाटप मेळावा घेतला जाणार असल्याची माहिती रिक्षावर भोंगा लावून मोठ्या आवाजात सांगत गावात फिरत असल्याचे श्रीगोंदा पोलीस पथकाच्या निदर्शनास येताच त्यांनी रिक्षाचालकाला थांबण्यास सांगितले.

मात्र पोलिसांना पाहताच रिक्षा चालकाने तात्काळ तेथून पळ काढला. याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पो.कॉ.संतोष कोपनर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाळासाहेब बन्सीलाल नाहटा व रविंद्र अशोक बोरुडे या दोन व्यक्तींवर कोविड ९५ या रोगाबाबत मा.जिल्हाधिकारी यांचे ३१ ऑगस्टचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:-