मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी खरेदी करण्यात येणार ७ कोटींची बस

टीम महाराष्ट्र देशा- मागील आठवड्यात १० माओवाद्यांचा खात्मा केल्यानंतर मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना धमकी देण्यात आली होती. यावर सुरक्षेचा उपाय म्हणून तेलंगणाच्या गृह विभागाने मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची सुरक्षा वाढवली असून त्यांच्यासाठी एक नवीन बुलेटप्रूफ बस खरेदी केली जाणार आहे ज्या बस ची किंमत किंमत सुमारे ७ कोटी रूपये इतकी आहे.

c. chandrashekhar rao

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परिवहन विभागाने सोमवारी अधिकाऱ्यांची बैठकीत  टेंडरचा निर्णय घेण्यात आला. यासाठी एका समितीचीही स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये परिवहन विभागाचे सचिव सुनील शर्मा यांचाही समावेश असेल.

रस्ते व परिवहन विभागाकडून येत असलेल्या या बसमध्ये अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षेसाठी खास वैशिष्टयं असतील. मुख्यमंत्री राज्याच्या दौऱ्यावर असताना या बसचा वापर होईल. सुमारे तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांसाठी बुलेटप्रूफ मसिडिज बेंझ बस आणण्यात आली होती.निवणुकांदरम्यान मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने दौर करतील. पण जिल्ह्यांमध्ये फिरण्यासाठी बुलेटप्रूफ बसचा वापर केला जाईल.