अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला

श्रीनगर : अमरनाथ यात्रेला भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण जखमी आहेत. जम्मूतील बनिहाल येथे ही घटना घडली.
अपघाताचं कारण नेमकं काय, हे अद्याप समजू शकलेलं नाही. जम्मू-श्रीनगर महामार्गावरील ही घटना आहे. घटनेनंतर तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं असून भाविकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
 
जखमींना दरीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरु आहे. ही बस अमरनाथ यात्रेच्या भाविकांना जम्मूहून पहलगाम इथे घेऊन जात होती. रस्त्यातच ही दुर्दैवी घटना घडून , अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे.