fbpx

पाकिस्तानच्या प्रत्येक गोळीला बॉम्बने उत्तर दिले पाहिजे- शहा

amit shah

टीम महाराष्ट्र देशा- मागील काही दिवसात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, घुसखोरी आणि दहशतवादी कारवायांचे प्रमाण वाढत आहे या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि वाढत्या कारवाया लक्षात घेता आता त्यांच्या प्रत्येक गोळीला बॉम्बने उत्तर दिले पाहिजे हाच एक पर्याय आता उरला आहे असं वक्तव्य भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे.नवी दिल्ली येथे पत्रकारांशी शहा यांनी संवाद साधला यावेळी पाकिस्तान संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर शहा यांनी हि प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले अमित शहा
पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि वाढत्या कारवाया लक्षात घेता आता त्यांच्या प्रत्येक गोळीला बॉम्बने उत्तर दिले पाहिजे हाच एक पर्याय आता उरला आहे.सर्जिकल स्ट्राइक केला तरीही त्यांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. भारताविरोधात पाकिस्तानच्या कारवाया थांबताना दिसत नाहीत. पाकिस्तान अजूनही भारतात दहशतवादी पाठवत आहे. त्यांच्या गोळ्यांमुळे निष्पाप लोकही मारले जात आहेत. हे आता कदापी सहन केले जाणार नाही