ईशान्येतील विजयानंतर अमित शाह आणि सरसंघचालकांची तीन तास चर्चा

टीम महाराष्ट्र देशा : ईशान्येकडील निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवल्यानंतर नागपुरात भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. दोघांमध्ये साडे तीन तास चर्चा झाली. भेटीत नेमकी काय चर्चा झाली,हे मात्र गुलदस्त्यात आहे.

याशिवाय या भेटीमागे आणखी एक कारण असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. तो म्हणजे, नागपुरात 9, 10 आणि 11 मार्चला संघ प्रतिनिधींची सभा होणार आहे. संघ परिवारातील सर्व प्रतिनिधी आणि संघटना या कार्यक्रमाला उपस्थिती लावतात. त्यामुळे भेटीमागचं हे एक कारण असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या ईशान्येकडील राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चांगलं यश मिळवलं. त्यानंतर अमित शाह लगेचच नागपुरात दाखल झाले.