आपचा संस्थापक सदस्य असणारा ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

arvind kejariwal

टीम महाराष्ट्र देशा- एकेकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू असलेले कवी कुमार विश्वास आता भाजपाच्या वाटेवर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.गेल्या वर्षी राज्यसभेचे तिकीट न मिळाल्याने विश्वास नाराज होते.विश्वास यांना जर भाजपला आपल्या गोटात सामील करण्यात यश मिळाले तर आप आणि कॉंग्रेसला देखील हा मोठा धक्का असणार आहे.

दिल्लीतील भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी सोमवारी रात्री कुमार विश्वास यांची भेट घेतली. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे जरी गुलदस्त्यात असले तरी कुमार विश्वास आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत असतील, अशी चर्चा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,कुमार विश्वास यांना भाजपा पूर्व दिल्ली मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.दरम्यान,लोकसभेच्या निवडणुकीच्यानिमित्ताने अनेक सेलिब्रिटी राजकारणात आपले भविष्य आजमावत आहेत. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर,क्रिकेटर गौतम गंभीर हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.