‘हा’ बडा नेता कॉंग्रेसला राम-राम ठोकण्याच्या तयारीत

टीम महाराष्ट्र देशा-  लोकसभेचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे मात्र तत्पूर्वीच कॉंग्रेसमधील अंतर्गत नाराजी बाहेर येवू लागली आहे. मुस्लीम आणि ख्रिश्चन यांना तिकीट वाटप करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते रोशन बेग यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. बेग लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.

सोमवारी त्यांनी काँग्रेसवर मुस्लिमांना डावलल्याचा आरोप करत पक्षावर नाराजी व्यक्त केलीय. ‘कर्नाटकात काँग्रेसनं ख्रिश्चनांना एकही जागा दिली नाही तर मुस्लिमांना केवळ एका जागेवर तिकीट दिलं. मुस्लिमांना डावलण्यात आलं. यामुळे मी चिंतेत आहे. पक्षानं आमचा केवळ वापर केलाय’ असं त्यांनी म्हटलंय. यावेळी, येत्या काही दिवसांत तुम्ही काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार का? या प्रश्नावर ‘गरज पडली तर अवश्य असं होईल’ असं उत्तर बेग यांनी दिलं.