fbpx

‘हा’ मोठा नेता कॉंग्रेसमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत

टीम महाराष्ट्र देशा :  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच राज्यासह देशातही कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. महाराष्ट्रातही कॉंग्रेसला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

या निवडणुकीनंतर देशासह राज्यात कॉंग्रेस खिळखिळी झाली आहे. परंतु राज्यात कॉंग्रेससाठी दिलासादायक बातमी आहे. कारण महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे कॉंग्रेसमध्ये घरवापसी करण्याची शक्यता आहे. नारायण राणे जर पुन्हा काँग्रेसमध्ये आले तर त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नारायण राणे हे महाराष्ट्रातील अनुभवी नेते आहेत. कॉंग्रेसला अशा परिस्थितून बाहेर काढण्यासाठी नारायण राणे महातेवाची भूमिका बजावू शकतात