सरकारचा मोठा निर्णय ; तब्बल ‘इतक्या’ शिक्षकांची करणार भरती

shikshak bharti

मुंबई : गेल्या २ वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. तर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत.

शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक भरतीची परीक्षा झाली नव्हती. शिक्षण क्षेत्रात आपले भवितव्य घडवू इच्छिणाऱ्या भावी शिक्षकांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला मान्यता दिली आहे.

शिक्षक पात्रता परीक्षाचे (टीईटी) आयोजन १५ सप्टेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात होणार आहे. साधारणपणानं टीईटीचे दोन पेपर घेण्यात येतात. महाराष्ट्रात टीईटी परीक्षेचं आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात येतं. 1 ली ते 5 वी या वर्गांना अध्यापन करण्यासाठी एक पेपर द्यावा लागतो. तर सहावी ते आठवीची परीक्षा देण्यासाठी दुसरा पेपर द्यावा लागतो.

टीईटीचा पेपर क्रमांक 1 देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयाती डिप्लोमा म्हणजेच डीएड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याशिवाय दुसऱ्या पेपरसाठी डी.एड उत्तीर्ण असणारे उमेदवार, पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक, शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP