अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का,’या’ बड्या नेत्याने ठोकला पक्षाला राम राम

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांना आपचे प्रवक्ते आणि नेते आशुतोष यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा देत मोठा धक्का दिला आहे.

आशुतोष यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच आशुतोष यांना राज्यसभेसाठी संधी न मिळाल्यामुळे ते नाराज होते . तर पक्षात त्यांनी घुसमट वाढली होती, त्यामुळेच त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

आशुतोष याचं स्पष्टीकरण

प्रत्येक प्रवासाचा कुठेतरी शेवट असतो, आपमधील माझे काम आणि सहकाऱ्यांशी संबंध शेवटपर्यंत अतिशय चांगले राहिले आहेत. मात्र, काही वैयक्तिक कारणामुळे मी राजीनामा देत आहे.

नागपूर : संघ मुख्यालयात ध्वजारोहण